गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आ़ राजे अम्ब्रिशराव महाराजांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता

Thursday, 4th December 2014 07:13:59 AM

 

ग़़डचिरोली, ता ४

गुरुवारी ५ डिसेंबर रोजी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अहेरी विधानसभा  क्षेत्राचे  नवनिर्वाचित आमदार राजे अम्ब्रिशराव महाराज यांचा समावेश होणार असल्याची विश्वसनीय माहिती असून, अम्ब्रिशराव महाराज आज बुधवारी मुंबईला रवाना झाले आहेत

गुरुवारी मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यात शिवसेना आणि भाजपच्या काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ्‍ा देण्यात येणार आहे त्यात आमदार राजे अम्ब्रिशराव महाराज यांचाही समावेश होणार असल्याचे समजते आमदार राजे अम्ब्रिशराव महाराजांना मुख्यमंत्री गोटातून दूरध्वनी आल्यानंतर आज ते तडकाफडकी मुंबईला रवाना झाले 

आमदार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे घराणे विदर्भवादी आहे यापूर्वी त्यांचे आजोबा राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी गडचिरोली व तत्कालिन सिरोंचा विधानसभा  क्षेत्राचे आमदार म्हणून तसेच तत्कालिन चंद्रपूर लोकसभा  क्षेत्राचे खासदार म्हणून कारकिर्द गाजवली आहे शिवाय आमदार राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे वडील राजे सत्यवानराव आत्राम यांनीही दोनदा सिरोचा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आहे आमदार राजे अम्ब्रिशराव आत्राम हे सर्वांत युवा आमदार असून त्यांनी लंडन येथून बिझनेस लॉ ची पदवी प्राप्त केली आहे उच्चशिक्षित, मितभाषी व मनमिळावू अशी ओळख्‍ा असल्याने त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आहे


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1DORM
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना