गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आ़ डॉ़ देवराव होळी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल

Wednesday, 3rd December 2014 08:14:20 AM

 

गडचिरोली,ता़३ 

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले आमदार डॉ़देवराव होळी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे़ त्यामुळे नागरिकांचे लक्ष या याचिकेच्या निकालाकडे लागले आहे़

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ़ देवराव होळी यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविली व ते निवडूनही आले़ त्यांच्याविरूद्ध फारवर्ड ब्लॉक पक्षाकडून नारायण जांभूळे रिंगणात होते़ मात्र ते पराभूत झाले़ आता नारायण जांभूळे यांनी उच्च न्यायालयात डॉ़होळी यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे़ डॉ़ देवराव होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत शासकीय सेवेत असताना २००८-०९ या कालावधीत त्यांनी स्वत:च्या शकुंतला मेमोरीयल ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने सिकलसेल प्रकल्प राबविला होता़ त्यासाठी संस्थेला ३२ लाख ८२ हजार रुपये निधी देण्यात आला होता़ त्यासाठी ५० कर्मचारी दाखवून खोट्या दस्तऐवजांच्या आधारावर त्यांनी ८ लाख ६८ हजार ३६३ रुपयांची उचल केली, अशी तक्रार तत्कालिन मुख्य कार्यपालन अधिकाºयांनी चामोर्शी पोलिस ठाण्यात केली होती़ त्याअनुषंगाने डॉ़देवराव होळी यांच्यासह संस्थेच्या अन्य पदाधिकाºयांवर कलम ४२०, ४०९ व ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते़

तसेच डॉ़होळी यांनी शासनाची पूर्वपरवानगी न घेता सार्वजनिक संस्ािंचे साहचर्य केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ व शासनाच्या रकमेची अफरातफर केल्याने डॉ़ होळी यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी १४ आॅक्टोबर २०१३ ला कळविले होते़ पुढे राजीनामा नामंजुरीला आव्हान देत डॉ़होळी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण नागपूर येथे याचिका दाखल केली होती़ तेव्हा प्राधिकरणाने होळी यांची याचिका खारीज केली होती़ या सर्व बाबींच्या अनुषंगाने नारायण जांभूळे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे़ विधानसभा निवडणुकीतील इव्हीएम मशिनच्या मतमोजणीची सत्यता तपासणे, डॉ़ देवराव होळी यांची निवड रद्द करणे, नव्याने निवडणूक घेणे, दररोज सुनावणी ठेवून ६ महिन्यांच्या आंत याचिका निकाली काढणे,या याचिकेचा संपूर्ण खर्च डॉ़होळी यांच्याकडून वसूल करावा, अशी विनंती नारायण जांभूळे यांनी याचिकेद्वारे केली आहे़

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1441C
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना