गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

दोन वेगवेगळ्या अपघातात १ ठार, ४ जखमी

Wednesday, 3rd December 2014 08:01:24 AM

 

गडचिरोली, ता़ ३

कार व मोटारसायकलच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात १ जण ठार, तर चार जण जखमी झाल्याच्या  घटना काल २ डिसेंबरच्या रात्री आरमोरी तालुक्यातील देऊळगावजवळ, तर आज ३ डिसेंबरला सकाळी कुरखेडा तालुक्यातील तळेगावजवळ घडल्या़ 

निकेश शंकर गुरनुले (२२) रा.शिवनी, ता.गडचिरोली असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निकेश गुरनुले, खुशाल पुरूषोत्तम पोरटे (२३) व जागृत मनोहर गजभिये (२५) रा.शिवनी हे किरण ताटपल्लीवार यांच्या मालकीच्या  एम.एच.२०/६९९९ क्रमांकाच्या मारूती कारने  काल २ आॅक्टोबर रोजी नागपूर येथे काही कामानिमित्त गेले होते. नागपूर येथून कामकाज आटोपून गडचिरोलीकडे येत असताना देऊळगावजवळील वळणावर  कारचालक खुशाल पोरटे यांचे कारवरून नियंत्रण सुटले. यामुळे कार रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडाला आदळली.या भीषण अपघातात निकेश गुरनुले हा जागीच ठार झाला. या अपघातात कारचा चेंदामेंद झाला.

घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. मात्र, उपचारापूर्वीच निकेश गुरनुले याचा मृत्यू झाला. कारचालक खुशाल पोरटे व जागृत गजभिये  गंभीर जखमी झाल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री.बच्चलवार घटनेचा तपास करीत आहेत.

अपघाताची दुसरी घटना कुरखेडा-तळेगाव मार्गावर घडली़ तळेगाव येथे विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी जात असताना  विरूध्द दिशेने येणाºया दुचाकीने दिलेल्या धडकेत दोन शिक्षक गंभीर झाले. ही घटना आज ३ डिसेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता कुरखेडा-तळेगाव मार्गावर घडली. विश्वास तारक गोस्वामी (२४) रा.देसाईगंज व बाबासाहेब गोविंदा रामटेके (२५) रा.वडेगाव अशी अपघातात जखमी झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. ते कॉन्व्हेंटचे शिक्षक आहेत. अपघात घडताच  शिक्षकाच्या दुचाकीला धडक देणाºया दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पळ काढला. दोन्ही शिक्षक घटनास्थळावर पडून होते. याच सुमारास या मार्गावरून जाणारे जि.प.सदस्य अशोक इंदूरकर यांनी जखमींना आपल्या वाहनात टाकून कुरखेडा येथील रूग्णालयात भरती केले. दुखापत गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S46VR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना