बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

पोलिस मुख्यालयातून नक्षलवादी फरार

Tuesday, 2nd December 2014 07:24:01 AM

 

गडचिरोली, ता़२

छत्तीसगड राज्याच्या सीमेवरून ताब्यात घेतलेला एक नक्षलवादी चक्क गडचिरोली पोलिस मुख्यालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याची घटना सोमवारी(ता़१) घडली़ यामुळे पोलिस विभागात खळबळ माजली आहे़ रणजित उर्फ चंद्रिका जेठूराम राऊत(४५)असे या नक्षलवाद्याचे नाव आहे़ याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी रणुनाथ भवरे या पोलिस हवालदारास तडकाफडकी निलंबित केले आहे़

एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथील मूळ रहिवासी असलेला रणजित उर्फ चंद्रिका राऊत हा नक्षल दलममध्ये कार्यरत होता़ १९९३ मध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला कारावासाची शिक्षा ठोठावली होती़ त्यानंतर त्याची पॅरोलवर सुटका झाली होती़ मात्र, १० वर्षांपासून तो फरार होता़  सध्या तो कोणत्याही दलममध्ये कार्यरत नव्हता़ काही दिवसांपूर्वी रणजितबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी त्यास फुलबोडी-गट्टा गावाजवळील जांभळी झोरा गावातून त्यास ताब्यात घेतले़ परंतु प्राथमिक चौकशीदरम्यान तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने दोन-तीन दिवसांपूर्वी त्याला गडचिरोली पोलिस मुख्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले होते़ मात्र, सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास भोजन करण्यासाठी नेत असताना पोलिसांची नजर चुकवून रणजितने पलायन केले़ त्यानंतर भंबेरी उडालेल्या पोलिसांनी गडचिरोलीनजीकच्या विसापूर व अन्य ठिकाणी शोधमोहीम राबविली़ मात्र, आज मंगळवारपर्यंत फरार नक्षल्यास पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते़ यासंदर्भात रणुनाथ भवरे या हवालदारास पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे़ 

दरम्यान, दोन नक्षल्यांनी येरकड येथील पोलिस मदत केंद्रातील केंद्रीय राखीव दलाच्या जवानांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे़ हे नक्षली आत्मसमर्पण करण्यासाठी सीआरपीएफकडे आले आहेत़ मात्र, त्यांनी पोलिस अधीक्षकांपुढे अधिकृतरित्या आत्मसमर्पण केले की नाही, ते कळू शकले नाही़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
I00US
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना