शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

धान खरेदीसंदर्भात आ ग़जबेंनी बोलावली बैठक

Sunday, 30th November 2014 08:04:25 AM

 

कुरखेडा, ता़३०

आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीसंदर्भात  घालून दिलेल्या जाचक अटी पुढे करून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी अद्यापही धान खरेदी केंद्रे सुरू न केल्याने शेतकर्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत असून, व्यापार्‍यांकडून त्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे़

नोव्हेंबर महिन्यात बहुतांश शेतकर्‍यांची धान कापणी झाली असून, अनेकांनी मळणीही केली आहे़ आता शेतकर्‍यांना शेतीच्या मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करावयाची असल्याने त्यांना धान विकणे गरजेचे आहे़ परंतु आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी धान खरेदी केंद्रे अद्यापही सुरू केलेली नाहीत़ त्यामुळे शेतकर्‍यांना नाईलाजाने व्यापाºयांकडे आपला धान विकावा लागत आहे़ मात्र, व्यापारी शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे़ ही वार्ता कानावर पडताच आ क़ृष्णा गजबे यांनी १ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कुरखेडा येथे बैठक बोलावली आहे़ या बैठकीत आग़जबे हे आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत़ आमदार महोदयांनी या बैठकीत तोडगा काढून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
85U05
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना