गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जिल्हयाबाहेरून आलेल्या १४ हजार २८७ नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के

Tuesday, 31st March 2020 07:03:24 AM

गडचिरोली,ता.३१: जिल्ह्यात बाहेरून आलेल्या १४ हजार २८७ नागरिकांना संचारबंदीच्या काळात बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे; या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांच्यावर कोरोना संसर्ग लक्षणांबाबत निरीक्षण ठेवले जात आहे.

त्यांनी गृह विलगीकरणात राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात  बाहेंरुन आलेल्या १५५२ नागरिकांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. आतापर्यंत गडचिरोली तालुक्यात १८८६,आरमोरी-१५४०, देसाईगंज-८९१, कुरखेडा-८२५, कोरची-७२६, धानोरा-८०४, चामोर्शी- २८७१, मुलचेरा-१५८७, एटापल्ली-१५०, अहेरी-१८५७, भामरागड-५४५, सिरोंचा-६२५ जणांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
454BR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना