गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

होम क्वारन्टाईन असलेल्या दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल

Tuesday, 31st March 2020 06:45:29 AM

कुरखेडा,ता.३१: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  होम क्वारन्टाईन केलेले दोन जण विनापरवानगीने सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघे कुरखेडा तालुक्यातील आंजनटोला व  डिप्राटोला येथील रहिवासी आहेत.

तालुक्यातील आंजनटोला व डिप्राटोला येथील मजूर परप्रांतात मजुरीसाठी गेले होते. तेथून स्वगावी परत आल्यानंतर त्यांना आरोग्य विभागाकडून १४ दिवसांसाठी होम क्वारन्टाईन करून निरीक्षणाखाली ठेवून त्यांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली होती. असे असतांना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास दोघेही कुरखेडा येथे सार्वजनिक ठिकाणी फिरत असतांना आढळून आले. त्यामुळे तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलीस ठाण्यात भांदवी १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१(ब),व महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JAWRZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना