बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मोटरसायकलची समोरासमोर धडक;एक ठार, दुसरा गंभीर

Monday, 30th March 2020 06:04:01 AM

कुरखेडा,ता.३०:  कुरखेडा-कुंभीटोला  मार्गावर  दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. राहुल दत्तात्रय उईके(१५), असे मृताचे, तर अमोल लीलाधर धाबेकर(२८) असे जखमीचे नाव आहे. दोघेही कुरखेडा येथील रहिवासी आहेत.

अमोल धाबेकर यांची कुंभीटोला येथे शेतजमीन असून शेतावरील  मोटारपंप बंद असल्याने  दुरुस्तीसाठी कुरखेडा येथून मिस्त्रीला शेतावर नेण्यासाठी तो मोटारसायकलने शेतावरून कुरखेड्याकडे येत होता, तर राहुल उईके हा मित्राची मोटरसायकल घेऊन कुंभीटोला रस्त्यावर फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. यामध्ये दोघेही मोटरसायकलस्वार गंभीररीत्या जखमी झाले  जखमींवर कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी दुसऱ्या गावी हलविण्यात आले. मात्र, राहुल उईके याचा ब्रम्हपुरी येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
024CI
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना