बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महादेव देवस्थानने केली पारधी समाजाच्या भिक्षुकांची भोजनाची व्यवस्था

Sunday, 29th March 2020 07:13:58 AM

कुरखेडा,ता.२९: तालुक्यातील अरततोंडी येथील श्री.भगवान महादेव देवस्थान  ट्रस्टच्या वतीने कुरखेडा येथे भिक्षा मागून उदर निर्वाह करणाऱ्या पारधी समाजातील कुटुंबाच्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली

अनेक दिवसांपासून कुरखेडा येथे नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील पारधी लोक आणि मंगलमेंढा येथील गोसावी बिऱ्हाड घेऊन राहतात.परंतु  लॉकडाऊन असल्यामूळे बाहेर पडता येत नाही, वाहतूक बंद असल्याने स्वगावी परतही जाऊ शकत नाही.  त्यांची बिकट स्थिती पाहून श्री.भगवान महादेव ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.तेजराम बुद्धे यांनी ट्रस्टच्या वतीने पुढील दहा दिवस त्यांच्या सकाळ व सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था केली 

 आज दुपारी त्यांच्या ठिकाणावर शिजवलेल्या अन्नाचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.बुद्धे, कुरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सेवानिवृत्त शिक्षक खुशाल फुलबांधे, देवानंद खुणे उपस्थित होते. यावेळी सामाजिक अंतर ठेवून अन्नाचे वाटप करण्यात आले.



तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EFG16
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना