शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आधारभूत धान खरेदी केंद्रे आता ३१ मेपर्यंत सुरु राहणार

Friday, 27th March 2020 06:27:15 AM

कुरखेडा,ता.२७: आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रांची मुदत येत्या ३१ मार्चला संपणार होती परंतु आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे मागणी केल्यानंतर आता धान खरेदी केंद्रांची मुदत ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी धान खरेदी केंद्रे बंद ठेवली होती.या व अन्य कारणांमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे धान खरेदी केंद्रावर वजनाअभावी पडून राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत ३१मार्चपर्यंत शेतकऱ्यांना धानाची विक्री करणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती

 यासंदर्भात आरमोरी विधानसभाक्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी  विधानसभा अधिवेशनादरम्यान १४ मार्च २०२० रोजी सभागृहात आरमोरी मतदारसंघासह गडचिरोली जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रांची ३१ मार्च २०२० रोजी संपत असलेली मुदत वाढवून ३० एप्रिल २०२० पर्यंत धान खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री महोदयांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या परवानगीनंतर राज्य शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र ३१ मे २०२० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही विक्रीअभावी धान शिल्लक आहे; त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0W2RO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना