बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठ २७ मार्चपर्यंत बंद

Monday, 23rd March 2020 06:45:57 AM

गडचिरोली,ता.२३: कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी देशभर प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ परिसर २७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विद्यापीठ परिसरातील वसतिगृहे व कार्यालयांमध्ये होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक व तातडीची उपाययोजना म्हणून कुलगुरुंनी हे निर्देश दिले आहेत. तथापि, कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव, वित्त व लेखा विभाग, परीक्षा व मूल्यमापन विभाग, संगणक, आवक-जावक विभागातील अधिकारी व एक कर्मचारी हे कार्यालयात राहतील, असेही कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HOOE4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना