शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

जावयाची सासुरवाडीत आत्महत्या

Friday, 20th March 2020 01:54:09 AM

कुरखेडा,ता.२०:तालुक्यातीलकढोली-उराडी मार्गावरील कोसी येथील जंगलात ३५ वर्षीय इसमाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.१९) संध्याकाळी उघडकीस आली 

दिवाकर नाजुकराव मडावी,असे मृत इसमाचे नाव असून, तो धानोरा तालुक्यातील येरकड येथील रहिवासी आहे. कोसी हे गाव दिवाकर मडावीची सासुरवाडी आहे. सहा महिन्यांपासून त्याची पत्नी कोसी येथे आली होती. तिला गावी नेण्यासाठी दिवाकर कोसी येथे दीड महिन्यापूर्वी आला होता. या कालावधीत त्याने सासऱ्याला विटा निर्मितीच्या कामात मदत केली. घटनेच्या दिवशी सकाळी गावी जातो असे म्हणून तो सायकलने निघाला. मात्र, संध्याकाळी जंगलात झाडाला गळफास लागलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. कुरखेड्याचे ठाणेदारसुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक केवळराम धांडे हे तपास करीत आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5ZHJ9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना