गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली जिल्ह्यातील २९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला स्थगिती

Tuesday, 17th March 2020 01:47:58 AM

गडचिरोली,ता.१७: कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने २९ मार्चला होणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील २९६ ग्रामपंचायतींची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने राज्यातील १५७० ग्रामपंचायती व इतर स्थानिक स्वराज्य्‍ संस्थेच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा आदेश आज जारी केला. या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील; त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत त्या स्थगित करण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. चार दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र सादर करण्यास १६ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. शिवाय नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडण्याच्या आदेशाला शिथिलता दिल्याने इच्छूक उमेदवारांचा जीव भांड्यात पडला होता. आता निवडणुकाच पुढे ढकलल्याने उमेदवारांना प्रचारासाठी बराच वेळ मिळणार असून, तप्त होत चाललेले गावातील राजकीय वातावरण शांत होणार आहे..


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1UKS6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना