शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

घोटसूरच्या पोस्टमास्तरचा मृतदेह आढळला मालेवाड्याच्या शेतात

Monday, 16th March 2020 07:38:45 AM

कुरखेडा,ता.१६: तालुक्यातील मालेवाडा येथील एका  मक्याच्या शेतात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे 

हरिदास शेंडे असे मृतकाचे नाव असून ते एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथील रहिवासी आहेत.घोटसुर येथे ब्रँच पोस्ट मास्तर म्हणून ते कार्यरत होते, अशी माहिती आहे. मालेवाडानजीकच्या धनेगाव येथील  नातेवाईकांच्या लग्नाला मृतक हरिदास शेंडे कुटुंबासह आले होते दरम्यान आज सकाळी त्याची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी मोटरसायकलने त्यांना मालेवाडा येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथे नेण्याचा सल्ला दिला.त्यानुसार नातेवाईक त्यांना पुन्हा धनेगाव येथे घेऊन जात असताना मालेवाडा गावानजीकच्या नदीच्या बाजूला असलेल्या मक्याच्या शेतामध्ये श्री.शेंडे पळून गेले.  त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते दिसले नाही.  दरम्यान सुभाष गुंडरे हे त्यांच्या शेतातील मक्याला  पाणी देण्यासाठी गेले असता दुपारी १२ वाजताच्या सुमारास  श्री.शेंडे हे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मालेवाडा पोलीस मदत केंद्राला देण्यात आली असून,पोलीस उपनिरीक्षक श्री.गिते तपास करीत आहेत.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0MB4P
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना