गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

१५ मार्चला नागपुरात वंचित आघाडीचा ओबीसी मेळावा

Friday, 13th March 2020 01:47:07 AM

गडचिरोली,ता.१३:वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १५ मार्चला दुपारी १२ वाजता अजंता सभागृह, नागपूर येथे ओबीसी समाजाच्या विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या मेळाव्याचे उद्घाटन  वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलिस आयुक्त धनराज वंजारी, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रा.गोविंद दळवी, माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे, माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, राहुल वानखेडे, रमेश पिसे, अजय लांजेवार, कुशल मेश्राम, संजय हेडाऊ, अरविंद सांदेकर, सिद्धार्थ डोईफोडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

या मेळाव्यात सीएए, एनआरसी, एनपीआर रद्द करणे, ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, भटके विमुक्त, अल्पसंख्याकांना सुरक्षा तथा नागरी हक्क मिळाले पाहीजे, सर्व मागासवर्गीय आयोगांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहीजे इत्यादी ज्वलंत मुद्द्यांवर विस्तृत मार्गदर्शन होणार आहे. या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बाळू टेंभुर्णे, गजानन कुकूडकर, योगेंद्र बांगरे,  हंसराज बडोले, जी.के.बारसिंगे, डाकराम वाघमारे, नसिर शेख, गुलाब मुगल, माला भजगवळी, ज्योती दहिकर,  संगीता मेश्राम, सपना रामटेके, दिलीप पदा, नरेश महाडोळे,  योगेश सोनुले, राजेंद्र बांबोळे, डॉ.योगेश नंदेश्वर, सीमा पोटाला, धर्मेंद्र गोवर्धन, मंगलदास चापले, एन.आर.रामटेके आदीनी केले आहे. 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DSNI2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना