शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

मुनघाटे महाविद्यालयात विद्यार्थिनींना मिळाला संगणक अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्याचा मान

Sunday, 8th March 2020 06:04:10 AM

गडचिरोली,ता.८: कुरखेडा येथील श्री.गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयात एमकेसीएल या प्रसिद्ध संगणक संस्थेचा केएलआयसी हा अभ्यासक्रम आजपासून सुरु करण्यात आला. जागतिक महिला दिनी सुरु झालेल्या या अभ्यासक्रमाचे उद्घाटन चार विद्यार्थिनींच्या हस्ते करुन मुनघाटे महाविद्यालयाने मुलींचा गौरव केला. महिला सबळीकरणाच्या दिशेने महाविद्यालयाने उचललेले हे पाऊल बघून, विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

या कार्यक्रमाला कोरपना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जोसेफ, मुनघाटे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.खोपे, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.तुपटे व निमंत्रक उपस्थित होते.

एमकेसीएलचे प्रमुख डॉ.विवेक सावंत हे काही दिवसांपूर्वीच मुनघाटे महाविद्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी एमकेसीएलचे नवीन लघु अभ्यासक्रम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. सर्व आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. शिक्षण घेताघेताच विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण घेता येणार असून, त्यांना त्याद्वारे घरबसल्या हजारो रुपये कमावता येणार आहेत. स्पोकन इंग्लीश, फ्री लांसिंग, जावा, टॅली विथ जीएसटी, वेब डिझायनिंग यासारखे लघु अवधीचे अभ्यासक्रम विद्यार्थ्याना उपलब्ध होणार आहेत. आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना स्वबळावर उभे राहण्यासाठी या केंद्राची निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी व्यक्त केला.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MT0X1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना