बुधवार, 1 एप्रिल 2020
लक्षवेधी :
  होम क्वारन्टाईन असलेल्या कुरखेडा तालुक्यातील दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल             मोटरसायकलची समोरासमोर धडक; एक ठार, दुसरा गंभीर-कुरखेडा-कुंभीटोला मार्गावरील घटना             नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या, कोरची तालुक्यातील नवेझरी येथील घटना             गडचिरोली जिल्ह्यात ३२२ वाहनधारकांवर कारवाई, ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल-पोलिसांची कारवाई             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
bg1
वाढदिवसाच्या शुभेच्छा
श्री. आनंदराव गेडाम
माजी आमदार, आरमोरी
वाढदिवस : 01 एप्रिल
वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रा. जोगेंद्र कवाडे
राष्ट्रीय अध्यक्ष पीरिपा
वाढदिवस : 01 एप्रिल

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

प्रा.श्याम मानव यांची २ मार्चला आरमोरीत कार्यशाळा

Sunday, 1st March 2020 02:38:14 PM

गडचिरोली,ता.१: गोंडवाना विद्यापीठ व महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.नसरुद्दीनभाई पंजवानी वाणीज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान आरमोरी येथील म.गांधी महाविद्यालयात २ मार्चला जादुटोणाविरोधी कायद्यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. २ मार्चला सकाळी साडेदहा वाजता कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी हे राहतील. यावेळी अनिसंचे प्रकल्प संचालक सुरेश झुरमुरे, सिनेट सदस्य अॅड.गोविंद भेंडारकर, मंडळाचे उपाध्यक्ष नूरअली पंजवानी उपस्थित राहतील.

या कार्यशाळेत जादुटोणाविरोधी कायद्याविषयी माहिती देणे, कायद्याबाबत गैरसमज दूर करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, कायद्याचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश, त्याचे प्रभावी क्रियान्वयन व अंमलबजावणीसह कायद्यातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. सिनेट सदस्य अॅड.गोविंद भेंडारकर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादुटोणाविरोधी कायद्याचा समावेश   करण्याविषयीचा ठराव सिनेटमध्ये मांडून तो मंजूर करवून घेतला होता. त्यानंतर या कायद्याबाबत जनजागृती करण्याविषयी एखाद्या महाविद्यालयात होणारी ही पहिलीच कार्यशाळा आहे. या कार्यशाळेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.गजेंद्र कढव,सहसमन्वयक प्रा.गजानन बोरकर यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QVM43
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना