गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

कार अपघातात शिक्षक दाम्पत्य ठार

Thursday, 27th February 2020 06:26:38 AM

कुरखेडा, ता.२७: कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीक कारने झाडाला धडक दिल्याने कारमधील शिक्षक दाम्पत्य ठार झाले. ही  घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. प्रा.कालिदास श्रीराम टिकले (५७) व प्रा. विद्या कालिदास टिकले (शेट्ये) (५७) रा. कुरखेडा,अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. कालिदास टिकले हे पत्नी विद्या यांच्यासह स्वत:च्या कारने खासगी कामाकरिता कुरखेड्यावरुन देसाईगंजकडे  जात  असताना  कुरखेड्यापासून ११ किलोमीटर अंतरावरील कसारी फाट्याजवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार  रस्त्याच्या  कडेला  असलेल्या  झाडाला आदळली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी  त्यांना मृत घोषित केले. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात, तर विद्या टिकले (शेट्ये) या कुरखेडा येथील शिवाजी  कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांना एक मुलगा असून तो नागपूर येथे नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. कालिदास टिकले हे ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव(भोसले) येथील मूळ रहिवासी असून, सध्या ते कुरखेडा येथील श्रीरामनगरात वास्तव्य करीत होते. टिकले दाम्पत्याच्या मृत्युमुळे कुरखेडा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
19AQU
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना