मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विरोधात बोलणाऱ्यांना तत्कालिन सरकारनं शहरी नक्षली ठरवलं:गृहमंत्री अनिल देशमुख

Friday, 21st February 2020 05:46:02 AM

गडचिरोली,ता.२१: सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना तत्कालिन राज्य सरकारनं शहरी नक्षली ठरवलं. त्यात अनेक साहित्यिक, कवी व विचारवंतांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे शरद पवारांच्या मागणीनंतर एसआयटीमार्फत भिमा कोरेगाव व एल्गार परिषदेचा स्वतंत्ररित्या तपास करण्याचे राज्य सरकारने ठरविल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

गृहमंत्री म्हणाले की, राज्य सरकार भिमा कोरेगाव व एल्गार परिषदेचा तपास योग्य दिशेने करीत होते. त्याच सुमारास शरद पवारांनी सरकारला एक पत्र देऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक वेगळी समिती गठित करण्याची सूचना केली होती. मात्र, त्याच वेळी केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे सोपविला. कलम ६ अन्वये केंद्र सरकारला हा अधिकार आहे. परंतु असे करताना केंद्र सरकारने राज्य सरकारला विश्वासात घेतले नाही, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

भिमा कोरेगाव व एल्गार प्रकरणाची चौकशी जाणीवपूर्वक करुन विरोधात बोलणाऱ्यांना शहरी नक्षली ठरविण्याचं काम केलं गेलं. त्यामुळे एसआटीमार्फत आम्ही चौकशी करीत आहोत. त्यासाठी कायदेशिर सल्ला घेत असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले. सीएए आणि एनआरसीच्या माध्यमातून राज्यातील कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही, असे देशमुख यांनी ठामपणे सांगितले.

नक्षलवादावर अंकुश ठेवण्यासाठी ५०० कोटींचे ड्रोन कॅमेरे खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. तो लवकरच अंमलात येईल. राज्यात लवकरच ८ हजार पोलिसांची भरती व राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ७ हजार सुरक्षा रक्षकांची भरती घेण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

पत्रकार परिषदेला आ.धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलिस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EK1CV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना