बुधवार, 1 एप्रिल 2020
लक्षवेधी :
  होम क्वारन्टाईन असलेल्या कुरखेडा तालुक्यातील दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल             मोटरसायकलची समोरासमोर धडक; एक ठार, दुसरा गंभीर-कुरखेडा-कुंभीटोला मार्गावरील घटना             नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या, कोरची तालुक्यातील नवेझरी येथील घटना             गडचिरोली जिल्ह्यात ३२२ वाहनधारकांवर कारवाई, ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल-पोलिसांची कारवाई             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
bg1
वाढदिवसाच्या शुभेच्छा
श्री. आनंदराव गेडाम
माजी आमदार, आरमोरी
वाढदिवस : 01 एप्रिल
वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रा. जोगेंद्र कवाडे
राष्ट्रीय अध्यक्ष पीरिपा
वाढदिवस : 01 एप्रिल

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

छत्तीसगड सीमेवरील चकमकीत एक नक्षली ठार

Monday, 17th February 2020 02:10:47 PM

गडचिरोली,ता.१७: भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यापासून ४० किलोमीटर अंतरावरील व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलात पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उदध्वस्त करीत एका नक्षल्यास कंठस्नान घातले. या कारवाईवरुन परतत असताना नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी पोलिस जवानाच्या पिट्टूतून आरपार गेली. मात्र, जवानास कुठलीही इजा झाली नाही.

नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती उर्फ सोनू याने पोलिसांवर हल्ला करण्याच्या हेतूने छत्तीसगड सीमेवरील अबुझमाड जंगलात मोठे शिबिर आयोजित केले होते. जवळपास ३०० नक्षली या शिबिरात होते. त्यांनी पोलिसांवर एके-४७ व एलएमजी यासारख्या आधुनिक शस्त्रांनी गोळीबार केला. परंतु पोलिस दलाच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नक्षल्यांना शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्युत्तर दिले. यात एक नक्षलवादी ठार झाला. परंतु नक्षल्यांनी आपल्या सहकारी नक्षल्याचा मृतदेह घेऊन पळ काढला.

या घटनेनंतर परत येत असताना नक्षल्यांनी घमंडी व फोदेवाडा जंगलात पुन्हा पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी शौर्याने हा हल्ला परतवून लावला. या घटनेत एका जवानाच्या पिट्टूतून गोळी आरपार बाहेर निघाली. परंतु जवानास कुठलीही इजा झाली नाही.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाच्या जवानांनी ही कामगिरी बजावली. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व जवानांचे कौतुक केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UHK2C
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना