बुधवार, 1 एप्रिल 2020
लक्षवेधी :
  होम क्वारन्टाईन असलेल्या कुरखेडा तालुक्यातील दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल             मोटरसायकलची समोरासमोर धडक; एक ठार, दुसरा गंभीर-कुरखेडा-कुंभीटोला मार्गावरील घटना             नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या, कोरची तालुक्यातील नवेझरी येथील घटना             गडचिरोली जिल्ह्यात ३२२ वाहनधारकांवर कारवाई, ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल-पोलिसांची कारवाई             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
bg1
वाढदिवसाच्या शुभेच्छा
श्री. आनंदराव गेडाम
माजी आमदार, आरमोरी
वाढदिवस : 01 एप्रिल
वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रा. जोगेंद्र कवाडे
राष्ट्रीय अध्यक्ष पीरिपा
वाढदिवस : 01 एप्रिल

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

मतीमंद युवतीवर अतिप्रसंग; पाच जणांवर गुन्हा दाखल, आरमोरी तालुक्यातील घटना

Sunday, 16th February 2020 01:35:37 PM

गडचिरोली,ता.१६: गावातील मतीमंद युवतीवर वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी अतिप्रसंग करणाऱ्या पाच जणांवर आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित युवती ही आरमोरी तालुक्यातील रहिवासी असून, ती मतीमंद आहे. तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेत गावातील तिघे व अन्य गावातील दोन जणांनी तिला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या ठिकाणी अतिप्रसंग केला. शिवाय या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. मागील एक वर्षापासून हा प्रकार सुरु होता. अलीकडेच पीडित युवतीला गर्भधारणा झाली. कुटुंबीयांनी वैदयकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्‌पन्न झाले. त्यानंतर पीडितेच्या काकूने आरमोरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी देविदास मनिराम कुमरे(३५), दिगंबर विश्वनाथ दुर्गे (५२), विजय गजानन कुमरे(२९), सुधाकर तुळशीराम कुमोटी(४५) व मेघशाम नामदेव पेंदाम(२४) यांच्यावर भादंवि कलम ३७६ (२)(एल) ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे व श्री.चव्हाण प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1SKSN
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना