गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

Sunday, 16th February 2020 12:13:19 AM

कुरखेडा,ता.१६: तालूक्यातील पुराडा-कोरची या राष्ट्रीय महामार्गावर पुराडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील एक जण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.१५) रात्री साडेनऊ वाजताच्या  सुमारास घडली 

बुद्धीनाथ प्रल्हाद शामकुंवर (४४) असे मृतकाचे नाव असून, सुनील मेश्राम( ३५) असे जखमीचे नाव आहे. दोघेही नागपूर येथील रहिवासी आहेत. हे दोघेही मोटारसायकलने काही कामानिमित्त कोरची येथे गेले होते. रात्री कुरखेड्याकडे परत येत असताना पुराडापासून दोन किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात शामकुंवर हे घटनास्थळीच गतप्राण झाले, तर गंभीर जखमी सुनील मेश्राम यास येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची नोंद पुराडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A0TGK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना