बुधवार, 1 एप्रिल 2020
लक्षवेधी :
  होम क्वारन्टाईन असलेल्या कुरखेडा तालुक्यातील दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल             मोटरसायकलची समोरासमोर धडक; एक ठार, दुसरा गंभीर-कुरखेडा-कुंभीटोला मार्गावरील घटना             नक्षल्यांनी केली माजी उपसरपंचाची हत्या, कोरची तालुक्यातील नवेझरी येथील घटना             गडचिरोली जिल्ह्यात ३२२ वाहनधारकांवर कारवाई, ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल-पोलिसांची कारवाई             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
bg1
वाढदिवसाच्या शुभेच्छा
श्री. आनंदराव गेडाम
माजी आमदार, आरमोरी
वाढदिवस : 01 एप्रिल
वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रा. जोगेंद्र कवाडे
राष्ट्रीय अध्यक्ष पीरिपा
वाढदिवस : 01 एप्रिल

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

प्लॅटिनम ज्युबिलीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे दालन उघडले: विजय वडेट्टीवार

Saturday, 15th February 2020 05:07:17 PM

गडचिरोली,ता.१५: शहरातील प्लॅटिनम ज्युबिली सोसायटीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षणाचे मोठे दालन उघडले असून, येथे भविष्यात विद्यापीठ उभे राहील, याची प्रचिती शाळेचा भव्य परिसर  व सुविधा बघून येते, असे प्रशंसोद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन, तसेच बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.

प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन श्री.वडेट्टीवार यांच्या हस्ते शुक्रवारी(ता.१४) झाले, त्यावेळी ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य अमिन पटेल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजा पवार उपस्थित होते. श्री.वडेट्टीवार पुढे म्हणाले, सातत्याने शंभर टक्के निकाल देणारी व विदर्भातील एक उत्तम दर्जाची शाळा म्हणून प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलने नाव लौकिक केला आहे. येथे उपलब्ध सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास नक्कीच होईल, असे ते म्हणाले.

आ.अमिन पटेल यांनी गडचिरोलीसारख्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त शाळा निर्माण करणे, हे प्रशंसनीय असल्याचे सांगितले. डॉ.सुलेमान विराणी यांनी विद्यार्थ्यानी शिक्षणावर प्रेम करावे, तसेच मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषांवर आपले प्रभुत्व गाजवावे, असे आवाहन केले.

संस्थेचे सचिव अजिज नाथानी हे संस्थेचे बॅकबोन असून, त्यांच्या अथक परिश्रमामुळेच संस्था आज यशाच्या शिखरावर आहे. विद्यार्थी ते व्यवस्थापक  म्हणून त्यांचे कार्य स्पृहणीय आहे, असे प्राचार्य रहीम अंमलानी म्हणाले.

यावेळी सदन इंडियाचे अध्यक्ष अमिन लढ्ढा यांच्या हस्ते विजय वडेट्टीवार यांचा, तर नादिरा दमानी यांच्या हस्ते आ.अमिन पटेल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अत्यंत खडतर परिस्थितीत अथक परिश्रम करुन शाळेची इमारत पूर्णत्वास नेल्याबद्दल अजिज नाथानी यांना विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाय अल्लाउद्दीन नाथानी, डॉ.कमरुद्दिन लाखानी, हमीद नाथानी, करीम नाथानी, कमरुद्दीन पंजवानी, अब्दूल लालानी, रहीम नाथानी यांचाही संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात अजिज नाथानी यांनी संस्थेच्या १९७२ पासून आजतागायतच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला जमाल प्रधान, अमिन लढ्ढा, अहमद लालानी, नादिया दमानी, सुलेमान पिराणी, नुरअली बताडा, फरीद नाथानी, न्या.शेखर मुनघाटे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, शिक्षणाधिकारी श्री.निकम, संस्थेचे अध्यक्ष डॉ.कमरुद्दीन लाखानी, सहसचिव करीम लाखानी, संचालक अमीर नाथानी, शौकत धमानी, समीर हिराणी निझार देवाणी उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यासाठी इवेंट मॅनेजर मिराजभाई  तसेच अँकर स्नेहा सिंग यांनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R9Z98
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना