गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

रोजगारासाठी कौशल्य विकासाची गरज: विवेक सावंत

Friday, 14th February 2020 05:31:56 AM

कुरखेडा,ता.१४: देशालाच नव्हे; तर संपूर्ण जगाला बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. शासकीय सेवेच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे नव्या युगात रोजगाराची संकल्पनाही बदलत आहे. या डिजिटल युगात जगात अपार रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्या घरबसल्या प्राप्त करता येतात. यासाठी कौशल्य विकासाची गरज असल्याचे प्रतिपादन एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी केले. 

कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विवेक सावंत यांनी  मार्गदर्शनाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत डिजिटल बोर्डवर चित्रफितीच्या माध्यमातून जगात उपलब्ध असलेल्या रोजगारांच्या संधी व त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबीवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेचे संस्थापक डॉ.सतीश गोगुलवार होते. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, विवेक सावंत यांचे सहकारी श्रीनिवास खेर, उदय पंचभोर उपस्थित होते.

प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.  कार्यक्रमाचे संचालन पंकज गेडाम, तर प्रा.डॉ.गुणवंत वडपल्लीवार यांनी आभार मानले.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
S8GRO
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना