शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

शेतातील बोअर पंपामुळे गेवर्धा येथे भीषण पाणीटंचाई

Friday, 14th February 2020 08:32:00 AM

कुरखेडा,ता.१४: तालुक्यातील गेवर्धा येथे शेतातील बोअर पंपामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अवैधरित्या बोअर करून भूगर्भातून पाण्याचा उपसा करण्यावर प्रतिबंध लावण्याची मागणी गेवर्धवासीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे

गेवर्धा येथे गावालगत असलेल्या शेतशिवारात ५०  ते १०० मीटर अंतरावर अनेक  शेतकऱ्यांनी बोअर करून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. धान पिकाकरिता भरपूर पाण्याची आवश्यकता असल्याने मोठया प्रमाणात बोअरच्या माध्यमातून भूगर्भातून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, घरगुती विहिरी, तसेच हातपंप  या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत्रांवर विपरित परिणाम झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अजून उन्हाळ्याचे जवळपास चार महिने शिल्लक आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले असून, उन्हाळ्यात पाण्याविना जीवन जगणे कठीण होणार आहे

गेवर्धा येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन गावालगत असलेले अनधिकृत बोअर तत्काळ बंद करावे, अशी मागणी गेवर्धावासीयांनी केली आहे

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
449W0
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना