गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नामांकित प्लॅटिनम ज्युबिली शाळेच्या इमारतीचे १४ ला उद्घाटन

Wednesday, 12th February 2020 07:14:56 AM

गडचिरोली,ता.१२: शहरातील नामांकित प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी १४ फेब्रुवारीला होणार आहे.

या सोहळ्याला आ.अमीन पटेल व पोलिस निरीक्षक राजा पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाय १४, १५ व १६ फेब्रुवारी असे तीन दिवस विद्यार्थ्याचे स्नेहसंमेलन होणार असून, रंगारंग कार्यक्रम होणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात प्लॅटिनम ज्युबिली शाळेचे अभिमानाने नाव घेतले जाते. प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीने १९७३ मध्ये या शाळेची स्थापना केली. गडचिरोलीत इंग्रजी माध्यमात सुरु झालेली ही पहिली शाळा आहे. सुरुवातीला अगदी छोट्याशा खोलीत सुरु झालेली ही शाळा आज प्लेग्रूप ते बारावी(विज्ञान) मधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून नावारुपास आली आहे.

मागील काही वर्षांपासून पालकांची पहिली पसंती ठरलेल्या या शाळेच्या नवीन प्रशस्त इमारतीचे बांधकाम आरमोरी मार्गावर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणाऱ्या सर्व सुविधा या नव्या इमारतीच्या माध्यमातून प्लॅटिनम ज्युबिली शाळेने दिल्या आहेत. भरपूर शुद्ध मोकळी हवा व नैसर्गिक प्रकाश असणाऱ्या मोठमोठ्या वर्गखोल्या, स्वच्छ प्रसाधनगृहे व निसर्गरम्य्‍ परिसर यामुळे विद्यार्थ्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन इमारतीत विज्ञान व संगणक विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा व विविध विषयांवर आधारित पुस्तके असलेले वाचनालय तसेच योग, कला व संगीत इत्यादींसाठी स्वतंत्र कक्ष संस्थेने उपलब्ध करुन दिले आहेत.

शिवाय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुण विकसित होण्याच्या दृष्टीने कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॉस्केटबॉल, फूटबॉल इत्यादी मैदानी खेळांसाठी क्रीडा साहित्यासह मैदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी आंतरिक खेळांसाठीसुद्धा स्वतंत्र दालन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. एखाद्या विद्यार्थ्यास अस्वस्थ वाटू लागले, तर त्यास महिला कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली आराम करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष आहे.

विद्यार्थ्यांना सातत्याने दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्लॅटिनम ज्युबिली संस्था कटिबद्ध असून, विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव अझिझ नाथानी, संचालक मंडळाचे सदस्य व प्राचार्य रहीम अमलानी यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EBKIP
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना