शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

एकाच कुटुंबातील तिघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Tuesday, 11th February 2020 07:19:38 AM

गडचिरोली, ता.१० : एकाच कुटुंबातील तिघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची थरारक घटना आज (ता. 10) दुपारी गडचिरोली शहरातील सेमाना- नवेगाव परिसरातील आनंदनगर भागातील शेतशिवारात घडली. मृतकामध्ये आई, वडील व मुलाचा समावेश आहे. रवीन्द्र नागोराव वरगंटीवार(५६), वैशाली रवीन्द्र वरगंटीवार( ४७) व साईराम रवीन्द्र वरगंटीवार (१९) अशी मृतांची नावे आहेत. ते आनंदनगर येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुलीने घरून पळून जाऊन एका आंतरजातीय युवकाशी विवाह केल्याने मनावर आघात निर्माण होऊन आई; वडील व भावाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घटनेबाबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे गडचिरोली शहरात खळबळ माजली आहे.

दुपारी घटनेची माहिती मिळताच विवाह केलेली वरगंटीवार यांची मुलगी व तिच्या पतीने चामोशीनजीकच्या पोहार नदीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस त्यांच्या मागावर असल्याने त्यांनी दोघांचेही प्राण वाचविले. सध्या दोघांवरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OAEUN
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना