शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; हजारो क्विंटल धानाची नासाडी

Saturday, 8th February 2020 02:55:13 PM

गडचिरोली,ता.८: काल रात्री व आज सकाळी आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील  जनजीवन  विस्कळीत  झाले  असून,  अनेक  धान  खरेदी  केंद्रांवर  ठेवलेल्या हजारो क्विंटल धानाची नासाडी झाली आहे. शिवाय विटाभट्टी व  रबी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

काल मध्यरात्रीनंतर गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज इत्यादी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. आज सकाळी आरमोरी तालुक्यातील वडेगाव परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे तेथील सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या धानाची नासाडी झाली. हे धान नाटकासाठी तयार केलेल्या खोलगट भागात ठेवण्यात आले होते. सुमारे १ हजार क्विंटल धान सडले आहेत. सकाळी काही शेतकऱ्यांनी स्वत: जाऊन ताडपत्री झाकली. मात्र, बहुतांश धान सडले असून, कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती अन्य केंद्रांवरही आहे. मागील चोवीस तासांत धानोरा तालुक्यातील चातगाव येथे सर्वाधिक ४०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धानोरा तालुक्यात २७.८, तर गडचिरोली तालुक्यात २५.२ मिलिमीटर पाऊस पडला. मुरुमगाव येथे २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान अवकाळी पावसामुळे विटाभट्टी व रबी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FQ4FH
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना