गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

देसाईगंजच्या राष्ट्रीय लोक अदालतीत १७ प्रकरणांचा निपटारा

Saturday, 8th February 2020 03:16:30 AM

देसाईगंज,ता.८: नवी दिल्ली येथील राष्ट्रीय  विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये आज  देसाईगंज येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित दिवाणी, फौजदारी तसेच प्री-लिटीगेशनच्या १७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून ७ लाख ३९ हजार ५१६ रुपयांची सिव्हील रिकव्हरी करण्यात आली. देसाईगंज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांच्या अध्यक्षतेखाली ही लोकअदालत पार पडली.

यावेळी देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्त्या मेरी विल्सन, अॅड. संजयगुरू, अॅड. वारजूरकर, अॅड. मंगेश शेंडे, अॅड.किशोर चोपकार, अॅड. अविनाश नाकाडे, अॅड. लाँगमार्च खोब्रागडे, अॅड. दत्ता पिलारे, अॅड.नेहा इलमुलवार, अॅड. तारिक सौदागर, अॅड. सुरेश रासेकर व अन्य सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते. या लोकअदालतीत १७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यात यात महावितरण कंपनी, नगरपरिषदेचे कर, बँकांचे थकित कर्जप्रकरण तसेच दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे.

या लोकअदालतीला नगर परिषद कर विभागाचे अधिकारी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, एसबीआय, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचे व्यवस्थापक व महावितरणचे उपविभागीय अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.

लोकअदालतीच्या आयोजनासाठी देसाईगंज न्यायालयाचे सहायक अधीक्षक एस.पी.अंबागडे, स्टेनो सुनील कनोजिया, वरिष्ठ लिपिक रवी माणुसमारे, तेलंग, विजय कावळे, मुकेश कावळे, अंकुश मच्छीरके, राजू बिहा, राजेंद्र, कोर्ट मोहरर बालाजी ठाकरे, प्रवीण मेश्राम यांनी सहकार्य केले.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
XH91B
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना