शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना परप्रांतातून अटक

Monday, 3rd February 2020 02:24:35 PM

गडचिरोली,ता.३: दाम दुप्पट देण्याच्या नावाखाली नागरिकांना लुबाडणाऱ्या सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा.छायन, जि.झाबुआ(मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत, रा.राठधनराज, जि.बासवारा(राजस्थान) अशी आरोपींची नावे असून, न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

रमेश्चंद्र नायक व अन्य सात जणांनी सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम नामक कंपनी स्थापन करुन या कंपनीच्या शाखा ठिकठिकाणी उघडल्या होत्या. गडचिरोली येथेही या कंपनीची शाखा होती. कंपनीने कमी कालावधीत जास्त रकमेचे आमिष दाखवून अभिकर्त्यांमार्फत ठेवीदारांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले होते. गडचिरोली शाखेत ५१ अभिकर्त्यांमार्फत २१३७ नागरिकांनी २ कोटी २९ लाख ३ हजार ४९० रुपये गुंतविले आहेत. परंतु ऑक्टोबर २०१५ मध्ये कंपनीने अचानक गडचिरोली येथील कार्यालय बंद केले. पुढे बऱ्याच कालावधीनंतर ठेवीदारांनी तक्रार केल्याने गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु करुन दोन संचालकांना १ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी प्रकरणाचा तपास करीत आहेत.

गडचिरोलीत साईप्रकाश, सुविधा फॉर्मिंग, मैत्रेय, आरोग्य धनवर्षा या कंपन्यांनीही अशीच कार्यालये उघडून नागरिकांची फसवणूक केली आहे. यातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. अशा कंपन्यांमध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असेल तर ठेवीदारांनी आपल्या पॉलिसी बाँडसह स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी केले आहे. दरम्यान, स्थानिक अभिकर्त्यांवरच विश्वास ठेवूनच नागरिकांनी या बोगस कंपन्यांमध्ये पैसे गुंतविले होते. त्यामुळे या अभिकर्त्यांचीही कसून चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K34AG
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना