गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेणारा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

Friday, 31st January 2020 06:36:54 AM

गडचिरोली,ता.३१: रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला शासनाकडून मिळालेल्या मदतीची रक्कम मंजूर करुन दिल्याचा मोबदला म्हणून एका शेतकऱ्याकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज नवेगाव(रै) बिटाचा वनरक्षक महेश नामदेव तलमले(४०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.

तक्रारकर्ता हा दर्शनी (चक) येथील रहिवासी असून, शेतकरी  आहे. त्याच्या पत्नीला रानडुकराने हल्ला करुन जखमी केले होते. यामुळे त्याला नियमानुसार  १ लाख २५ हजार रुपयांची मदत शासनाने मंजूर केली. परंतु ही रक्कम आपण मंजूर करुन दिली असून, त्याचा मोबदला म्हणून आपणास २५ हजार रुपये द्यावे, अशी मागणी वनरक्षक महेश तलमले याने केली.

परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्याच्या शेतशिवारात  सापळा रचला. यावेळी वनरक्षक महेश नामदेव तलमले यास तक्रारकर्त्याकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन २०१९)  नुसार चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक यशवंत राऊत, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू  धोटे, शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.  

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5KH15
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना