शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  जहाल नक्षली विलास कोल्हा याचे एके-४७ सह पोलिसांपुढे आत्मसमर्पण             बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी किशन नागदेवे यांची नियुक्ती

Wednesday, 29th January 2020 09:06:24 AM

गडचिरोली,ता.२९: देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते किशन नागदेवे यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आज शहरातील संस्कृती सभागृहात भाजपचे विदर्भ प्रदेश संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, पक्षाचे सरचिटणीस आ.डॉ.रामदास आंबटकर, खा.अशोक नेते,आ.प्रा.अनिल सोले, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे, रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी यांच्या उपस्थितीत सर्वबूथप्रमुख, सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत किशन नागदेवे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

कुशल संघटक व रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या किशन नागदेवे यांनी देसाईगंज नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या धुरा सांभाळली आहे. शिवाय २०१० ते २०१६ अशी सहा वर्षे ते भाजपचे जिल्हाध्यक्षहोते. त्यानंतर खा.अशोक नेते यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आली. खा.नेते यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर २०१९ रोजी श्री.नागदेवे यांना तात्पुरते जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले होते. परंतु यंदा पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यात येत असून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे सुरु आहे.

जिल्हाध्यक्षपदासाठी किशन नागदेवे, बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे व रमेश भुरसे या चार जणांनी मुलाखत दिली होती. त्यानंतर संघटनमंत्र्यांनी ही चार नावे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविली होती. प्रदेश कार्यकारिणीने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर आजच्या बैठकीत किशन नागदेवे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी श्री.नागदेवे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EV28G
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना