शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

२० वर्षांपासून फरार आरोपींना अटक

Monday, 27th January 2020 03:31:02 PM

गडचिरोली,ता.२७: विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या व पोलिस आणि न्यायालयाला गुंगारा देणाऱ्या ३ जणांना विशेष पथकाच्या पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे.

गंगाराम विस्तारी तलांडी, रा.आलापल्ली, कार्तिक विनोद हलधर, रा.नागेपल्ली व अंताराम काजा परते रा. आलापल्ली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. काही गुन्ह्यातील आरोपी २० ते ४० वर्षांपासून सापडले नाहीत. त्यामुळे न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रकरणांचा निवाडा करण्यात अडचणी येत असल्याबाबत न्यायालयाने पोलिस अधीक्षक कार्यालयाला कळविले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष पथकाची निर्मिती केली. या पथकाने ९५ सुप्त नस्ती प्रकरणातील आरोपींचे निरंतर वॉरंट जारी केले. त्यानंतर तीन आरोपींना आलापल्ली व गुंडापल्ली येथून अटक केली. तसेच चार आरोपींचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करुन न्यायालयास सादर केले.तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GE6SU
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना