शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोलीच्या १० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्यपदक जाहीर

Saturday, 25th January 2020 03:37:14 PM

गडचिरोली,ता.२५: केंद्रीय गृहमंत्रातलयातर्फे नक्षलविरोधात उत्कृष्‌ठ कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील १० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्यपदक व गुणवत्तापूर्ण सेवा पदक आज जाहीर करण्यात आले.

या यादीत तत्कालिन पोलिस अधीक्षक(अभियान) व सध्या चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. महेश्वर रेड्डी, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी व सध्या मनमाड येथे कार्यरत समीरसिंह साळवे, सहायक पोलिस निरीक्षक मिठू जगदाळे,पोलिस नाईक अविनाश कांबळे, पोलिस शिपाई सर्वश्री वसंत आत्राम, हमीत डोंगरे, सुरपत वड्डे,.आशिष हालामी, विनोद राऊत व.नंदकुमार आग्रे या १० जणांचा समावेश आहे.

त्याचबरोबर पोलिस दलात सातत्यपूर्ण उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अशपाक अली बाकर अली चिष्टीया व लक्ष्मण टेंभुर्णे यांना "गुणवत्तापूर्ण सेवा पदक" जाहीर झाले आहे.  प्रजासत्ताक दिनी गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयात  या सर्वांना सन्मानित केले जाणार आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UR88O
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना