शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोली नगर परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार मिनरल वॉटर

Friday, 24th January 2020 01:40:09 PM

गडचिरोली,ता.२४: नगर परिषदेंतर्फे चालविण्यात येणाऱ्या शहरातील दहाही शाळांमध्ये आरओ व वॉटरकूलर बसविण्यात आले असून, त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्याना आता मिनरलयुक्त व शुद्ध पेयजल प्यावयास मिळणार आहे.

गडचिरोली नगर परिषदेतील शिक्षण विभागातर्फे शहरात १० शाळा चालविल्या जातात. या शाळांसाठी २०१९-२० च्या नगर परिषदेच्या अंदाजपत्रकात भरीव निधीची तरतूद करण्यात आली होती. त्या निधीतून दहाही शाळांमध्ये आरओ व वॉटर कूलर संच बसविण्यात आले. रामपुरी शाळेतील वॉटर कूलरचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यामुळे विद्यार्थ्याना मिनरलयुक्त, शुद्ध तसेच उन्हाळ्यात पिण्याचे थंड पाणी मिळणार आहे.  तसेच विद्यार्थ्याचे आरोग्यही निरोगी राहण्यास मदत होईल, असे नगराध्यक्ष योगीता पिपरे यावेळी म्हणाल्या. आतापर्यत विद्यार्थ्यांना दप्तरांच्या ओझ्याबरोबरच पाण्याची बाटलीही सोबत घेऊन जावे लागत होते. आता या त्रासापासून विद्यार्थ्याना मुक्ती मिळणार आहे. पूर्वी क्षार व क्लोराईडयुक्त पाणी मिळायचे. आता स्वच्छ व थंड मिनरलयुक्त पाणी मिळणार आहे. आकांक्षित जिल्हा योजनेंतर्गत डीपीडीसीमधून नगर परिषदेला एक कोटी रुपये मंजूर झाले असून,यामधून नगर परिषदेच्या शाळांतील सर्व वर्गखोल्यांचे डिजीटलायझेशन, ई-लर्निंग व खेळाचे साहित्य देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी सांगितले. यावेळी वर्षा बट्टे व प्रमोद पिपरे यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण सभापती वर्षा बट्टे, नवनिर्वाचित शिक्षण सभापती रितू कोलते, पाणीपुरवठा सभापती वैष्णवी नैताम, महिला 
व बालविकास सभापती लता लाटकर, नीता उंदिरवाडे, नगरसेवक सर्वश्री मुक्तेश्वर काटवे, प्रमोद पिपरे, प्रशांत खोब्रागडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते वासुदेव बट्टे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निंबाळकर तर आभार मुख्याध्यापक साखरे यांनी मानले.तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
62J9G
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना