शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

वंचित आघाडीच्या बंदला गडचिरोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

Friday, 24th January 2020 05:36:35 AM

गडचिरोली,ता.२४: वंचित बहुजन आघाडीसह समविचारी पक्षांनी आज एनआरसी व सीएएच्या विरोधात पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला गडचिरोली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह देसाईगंज, कुरखेडा, चामोर्शी, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा इत्यादी तालुकास्थळीही दुपारपर्यंत बाजारपेठा बंद होत्या. विशेष म्हणजे, शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. गडचिरोलीत सकाळी बाजारपेठ कडकडीत बंद होती. येथे पोलिस निरीक्षक श्री.चौगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आज सकाळी गडचिरोली शहरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाजारपेठेत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत असताना काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवण्यास विरोध करुन महिला कार्यकर्त्यांशी हुज्जत घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण शांत झाले. दुपारी दोन वाजतानंतर बाजारपेठ पूर्ववत सुरु झाली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळू टेंभुर्णे, गजानन कुकडकर, गुलाब मुगल, काँग्रेसचे युवा नेते एजाज शेख, बाशिद शेख, वसिम खान, वंचित बहुजन आघाडीचे जी. के. बारसिंगे, योगेंद्र बांगरे, राजेंद्र बांबोळे, डॉ. योगेश नंदेश्वर, वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेत्या माला भजगवळी, सीमा दुर्गे, अमिता मडावी, आयशा शेख, सुनीता कुंभारे, किशोर भैसारे, प्रीतम साखरे, रितेश भैसारे, संदीप सहारे, भास्कर बांबोळे, दीपक बांबोळे, सप्निल उंदिरवाडे, भोजराज रामटेके, अनिल निकुरे,प्रमोद खोब्रागडे,अनिल राऊत, जया कोंडे, सुंदराबाई करकाडे, संगीता ढोलणे, पुष्पा बांबोळे, लता शेंद्रे, ध्रुवलता चव्हाण, आरिफ कनोजे, जाशिस पठाण, इसराईल कुंभारे, रहीम शेख, जुबेर पठाण, सरफराज पठाण, फरदिन शेख, शाहरूख शेख, साहिल पठाण, शादा पठाण, धर्मेंद्र गोवर्धन, भोजराज रामटेके इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6SQ1V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना