बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मुक्तेश्वर काटवे यांची भाजपा गडचिरोली शहराध्यक्षपदी निवड

Thursday, 23rd January 2020 08:45:15 PM

गडचिरोली,ता.२३: भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली शहराध्यक्षपदी नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांची निवड करण्यात आली आहे.

सध्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरु असून, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांची निवड केली जात आहे. गडचिरोली शहराध्यक्षपदाच्या निवडीसाठी १८ जानेवारीला शहरातील सर्व बूथप्रमुख, सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या पदासाठी १७ जण इच्छूक होते. त्यांची मुलाखत झाल्यानंतर १७ पैकी ११ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांना समर्थन दिले, तर ३ उमेदवारांनी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांना पाठिंबा दिला. एक उमेदवार तटस्थ राहिला. दोन उमेदवार असल्याने कोअर कमिटीने प्रदेश कार्यकारिणीला माहिती दिली. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीने ठरविल्यानुसार, विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांनी शहराध्यक्षपदी मुक्तेश्वर काटवे यांच्या नावाची घोषणा करण्यास जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांना सांगितले. जिल्हाध्यक्षांनी आमदार डॉ.देवराव होळी यांना काटवे यांच्या नावाची घोषणा करण्यास सांगितले.

त्यानुसार २३ जानेवारला आ.डॉ.होळी यांनी मुक्तेश्वर काटवे यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, नगरसेवक केशव निंबोड, प्रशांत खोब्रागडे, वर्षा बट्टे, पल्लवी बारापात्रे, वैष्णवी नैताम, लता लाटकर, उंदिरवाडे, विनोद देवोजवार, जनार्दन साखरे, देवाजी लाटकर, वासुदेव बट्टे, श्याम वाढई, निलीमा राऊत, दुर्गा मंगर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MN4A0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना