शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

Tuesday, 21st January 2020 07:17:13 AM

गडचिरोली,ता. २१: राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी २०२०-२१ या वर्षाकरिता मंजूर निधी व खर्चाचा आढावा घेतला. 

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला. २०२०-२१ या वर्षीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १४९६४ लाख, तर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ३७४१ लाख असा एकूण १८ हजार ७०५ लाख रुपयांचा आराखडा मंजूर असून, प्राप्त निधी व खर्चाची माहिती बैठकीत देण्यात आली. मंजुरी देण्यात आली. बैठकीत  जिल्ह्यातील मागील वर्षीच्या खर्चाबाबत चर्चा झाली. तसेच चालू वर्षीचा मंजूर निधी व अखर्चित निधी यावरही मंथन झाले.

जिल्ह्याबाबत असलेली ओळख आणि लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके असून दोघांच्या समन्वयाने विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल,असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोणताही निधी परत जाणार नाही याची काळजी सर्व विभागांनी घ्यावी. वीज न पोहचलेल्या गावांमध्ये वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक योजना तयार करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे,जिल्हाधिकारी दीपक सिंगला, प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FHQ74
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना