शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात वाघिणीचा मृत्यू

Saturday, 18th January 2020 06:26:04 AM

गडचिरोली,ता.१८: गडचिरोली वनविभागातील चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत अमिर्झा बिटातील खंड क्रमांक ४१७ मधील जंगलात आज एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली.

आज जंगलात वनविभागाचे कर्मचारी फायरलाईनचे काम करीत असताना त्यांना एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर वाघिणीचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. या वाघिणीच्या गळ्यात ई-१ असा इलेक्ट्रानिक पट्टा लावलेला होता. त्यामुळे ही वाघीण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील असावी, असा अंदाज आल्याने ब्रम्हपुरी येथील वनाधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी ही वाघीण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील असून, ती सात-आठ महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने १५ ते २० दिवसांपूर्वी वाघिणीचा मृत्यू झाला असावा, तसेच येथील जंगलात शिकार न मिळाल्याने भुकेमुळे तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
14TA1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना