गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गुरनोलीचे उपसरपंच राजन खुणे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

Saturday, 11th January 2020 08:07:41 AM

कुरखेडा,ता.११:  तालुक्यातील गुरनोली येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजन खुणे यांनी पत्नीच्या नांवावर वन विभागाच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण  केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
गुरनोली येथील वनविभागाच्या शासकीय जागेवर निस्तार पत्रकातील नोंदीनुसार शंकरपटकरिता राखीव असलेल्या जमिनीवर उपसरपंच राजन खुणे यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य गणेश तुलावी व अन्य ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या ठरावासह ठोस पुराव्यानिशी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे  केली होती.
या  तक्रारीच्या अनुषंगाने, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुरखेडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करुन उप मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांमार्फत्‍(ग्रा.पं.)जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला होता.  चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तिवाद ऐकून घेतला.त्यानंतर  हे प्रकरण शासकीय जागेवरील अतिक्रमणाचे असल्याचे स्पष्ट होत असल्याने, तसेच राजन खुणे यांनी शासकीय व सार्वजनिक वापराच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १४ (१) (ज-३) चा भंग केल्याचे  सिद्ध होत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी राजन खुणे यांना गुरनोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद व सदस्यत्व रद्द  केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
OFUFD
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना