शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  जहाल नक्षली विलास कोल्हा याचे एके-४७ सह पोलिसांपुढे आत्मसमर्पण             बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

प्रथमच झाल्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा

Thursday, 9th January 2020 02:28:18 PM

गडचिरोली,ता.९: आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा दरवर्षी होत असतात. परंतु यंदा प्रथमच एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या वतीने रांगी येथे शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलामुलींच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच शासकीय आदिवासी वसतिगृहातील मुलांमुलींच्याही क्रीडा स्पर्धा घेण्यात याव्यात, अशी विनंती गडचिरोली येथील वसतिगृहाचे गृहपाल रवींद्र गजभिये व विद्यार्थ्यानी गडचिरोलीच्या प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांना केली.त्यानुसार डॉ.जाखड यांनी जिल्ह्यातील गडचिरोली, कुरखेडा, अहेरी व भामरागड अशा चार विभागांच्या क्रीडा स्पर्धांचे नियोजन केले. त्यापैकी गडचिरोली विभागाच्या क्रीडा स्पर्धा रांगी येथे पार पडल्या. सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व वंदना महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या स्पर्धा झाल्या.वंदना महले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यात आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक १ व आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह चामोर्शी यांना विजेता संघ घोषित करण्यात आले. आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक २ व आदिवासी मुलींचे  शासकीय वसतिगृह  गडचिरोली  यांना उपविजेता  संघ  घोषित करण्यात आले. स्पर्धांच्या आयोजनासाठी शासकीय वसतिगृहाचे गृहपाल रवींद्र गजभिये, स्वाती देशपांडे,प्रशांत फरकाडे, कैलास उईके, अशोक जाधव, गीता झुरमुरे, रजनी मडावी व माला सोनवाने, रांगी आश्रमशाळेचे मुख्याधापक श्री. रामटेके व अधीक्षक श्री.आत्राम यांनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
XWHI6
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना