गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

६ पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात, काँग्रेसकडे ४, तर आविसं व ग्रामसभांकडे प्रत्येकी १

Tuesday, 31st December 2019 07:45:51 AM

गडचिरोली,ता.३१: आज झालेल्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांपैकी भाजपने ६ पंचायत समित्यांवर सत्ता स्थापन केली. काँग्रेसला ४, तर आदिवासी विद्यार्थी संघ व ग्रामसभांना प्रत्येकी एका पंचायत समितीवर वर्चस्व प्राप्त केले.

गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, व सिरोंचा या पंचायत समित्यांवर भाजपने सत्ता स्थापन केली. काँग्रेसने कोरची, कुरखेडा, मुलचेरा व एटापल्ली या चार ठिकाणी, तर आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी आणि ग्रामसभांनी भामरागड पंचायत समितीवर सत्ता प्रस्थापित केली.

गडचिरोली पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे मारोतराव इचोडकर, तर उपसभापतिपदी विलास दशमुखे निवडून आले. धानोरा पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या अनुसया कोरेटी, तर उपसभापतिपदी भाजपचेच विलास गावडे अविरोध विजयी झाले. चामोर्शी पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे भाऊराव डोर्लीकर, तर उपसभापती म्हणून वंदना गौरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.    

कुरखेडा पंचायत समितीवर भाजपच्या मदतीने कांग्रेस सत्तारूढ झाली, सभापतिपदी कांग्रेसच्या सुनंदा हलामी, तर उपसभापतिपदी अपक्ष सदस्य श्रीराम दुगा निवडून आले. कोरची पंचायत समितीत काँग्रेसचेश्रावण मातलाम यांची सभापतिपदी, तर शिवसेनेच्या सुशीला जमकातन यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली.देसाईगंज पंचायत समितीत सभापतिपदी भाजपच्या रेवता अनोले, तर उपसभापतिपदी शेवंता अवसरे विजयी झाल्या. आरमोरी पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या नीता ढोरे, तर उपसभापतिपदी  काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विनोद बावनकर विजयी झाले.

मुलचेरा पंचायत समितीच्या सभापतिपदी कॉंग्रेसच्या सुवर्णा येमुलवार, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रगती मनोज बंडावार यांची निवड झाली. अहेरी पंचायत समितीत आदिवासी विद्यार्थी संघाचे भास्कर तलांडे, तर उपसभापती म्हणून गीता चालुरकर यांची बिनविरोध निवड झाली. सिरोंचा पंचायत समितीत भाजपचे सत्यम मोडेम, तर उपसभापतिपदी रिक्कुला कृष्णमूर्ती निवडून आले. एटापल्ली पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे शालिकराम गेडाम, उपसभापतिपदी भाजपचे जनार्ध‌न नल्लावार यांची अविरोध निवड झाली. भामरागड पंचायत समितीच्या सभापतिपदी ग्रामसभेच्या बोई कोडापे, तर उपसभापतिपदी सुखराम मडावी निवडून आले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VU4TG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना