शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

विजय वडेट्टीवार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने गडचिरोलीत जल्लोष

Monday, 30th December 2019 06:33:43 AM

गडचिरोली,ता.३०: राज्याच्या मंत्रिमंडळात आ.विजय वडेट्टीवार यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटून जल्लोष केला.

गडचिरोली जिल्हा हा विजय वडेट्टीवार यांची कर्मभूमी राहिली आहे. त्यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाल्याने काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी करुन आनंद व्यक्त केला. यावेळी जिल्हायुवककाँग्रेसचे महासचिवकुणालपेंदोरकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती नंदू कायरकर, माजी नगरसेविका लता मुरकुटे, नीता वडेट्टीवार, कल्पना नांदेश्वर, कमलेश खोब्रागडे,सुनील पोरेड्डीवार,  प्रमोद पुण्यापवार, आरिफ शेख, संजय वानखेडे, साजन रचावार, सुनील तिडके, मनोज कांबळे, विकी रामटेके, संघपाल गेडाम, राकेश गणवीर, तुषार मडावी, कल्पक मुप्पीडवार, राकेश रत्नवार, स्वप्नील घोसे, रमेश धुडसे, गौरव डोईजड, साजन कुमरे, मनिष मेश्राम, भूपेश डोंगरे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपद मिळाल्याने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासह पूर्व विदर्भात विकासाची गंगा वाहू लागेल, असा आशावाद युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी व्यक्त केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4OG4L
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना