शनिवार, 28 मार्च 2020
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यात ३२२ वाहनधारकांवर कारवाई, ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल-पोलिसांची कारवाई             आधारभूत धान खरेदी केंद्रे आता ३१ मेपर्यंत सुरु राहणार-आ.कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांना दिलासा             कोरोना-गडचिरोली जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या ५९५० प्रवाशांची नोंद, सर्व जण प्रशासनाच्या देखरेखीखाली             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
bg1

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्यास ३ वर्षे कारावासाची शिक्षा

Thursday, 26th December 2019 02:41:59 PM

गडचिरोली,ता.२६: गावातील इसमास जातिवाचक शिवीगाळ करुन त्यास काठीने मारहाण करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ वर्षे कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विश्वनाथ यशवंत गहाणे(४८)रा.आंधळी असे शिक्षा झालेल्या दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना ७ नोव्हेंबर २०१५ ची आहे. आंधळी येथील अशोक रामदास बोदेले(५५) हे संध्याकाळी आवारात आलेल्या गायीला हाकलत बुद्ध विहारासमोरील रस्त्याने जात असताना विश्वनाथ गहाणे याने त्यास जातिवाचक शिवीगाळ करुन काठीने डोक्यावर मारहाण केली. बोदेले यांनी केलेली तोंडी तक्रार व वैद्यकीय अहवालावरुन कुरखेडा पोलिसांनी विश्वनाथ गहाणे याच्यावर भादंवि कलम ३२४ सहकलम ३(१)(१०)अन्वये गुन्हा दाखल केला होता. तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के यांनी तपास पूर्ण केल्यानंतर आरोपीस अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद व साक्षदारांचे बयाण ग्राह्य धरुन आरोपी विश्वनाथ गहाणे यास अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(१०) अन्वये ३ वर्षे कारावासाची शिक्षा व १ हजार रुपये दंड आणि कलम ३२४ अन्वये २ वर्षे शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
W0P5U
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना