शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Wednesday, 18th December 2019 07:00:08 AM

गडचिरोली,ता.१८: ९ वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. संदीप उर्फ संजय शंकर भाजीपाले(२६)रा.नैनपूर,ता.देसाईगंज असे शिक्षा झालेल्या दोषी युवकाचे नाव आहे.

ही घटना आहे ३० सप्टेंबर २०१८ ची. आरोपी संदीप उर्फ संजय भाजीपाले याने पीडित मुलीच्या काकूला खर्रा आणण्यासाठी पाठविले. त्यानंतर त्याने पीडित मुलीला गाठून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न

केला. दुसऱ्या दिवशी पीडित मुलीला छातीत दुखापत होऊ लागताच तिने आपल्या आईला आपबिती  सांगितली. त्यानंतर आईने देसाईगंज पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी संदीप भाजीपाले याच्यावर भादंवि कलम ३७६ व बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. पोलिस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. साक्ष पुरावा तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी संदीप भाजीपाले यास ५ वर्षाचा सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडातील रकमेपैकी २० हजार रुपये पीडित मुलीला भरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने पारीत केला.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8VRH1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना