सोमवार, 20 जानेवारी 2020
लक्षवेधी :
  चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात वाघिणीचा मृत्यू, भुकेमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज             गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सभापतिपदांवर भाजप-राष्ट्रवादी युतीचा वरचष्मा, काँग्रेसचा दारुण पराभव             गडचिरोली जिल्हा परिषदेचे चार सदस्य अपघातात गंभीर जखमी-कुरखेडा तालुक्यातील लेंडारी गावाजवळची घटना             प्रशासनाने घडविले गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना 'इस्रो'चे दर्शन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी:खा.रामदास तडस

Sunday, 15th December 2019 03:01:25 PM

गडचिरोली,ता.१४:विदर्भात तेली समाज मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हा समाज विविध जाती,पोटजातींमध्ये विखुरला आहे. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी तेली समाजातील सर्व घटकांनी संघटित होऊन  समाजाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे अध्यक्ष खा.रामदास तडस यांनी केले.

आज आरमोरी मार्गावरील सुप्रभात मंगल कार्यालयात श्री.संत जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, विदर्भ तेली समाज महासंघ, संताजी सोशल मंडळ व समस्त तेली समाजाच्या वतीने आयोजित श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव, तेली समाज मेळावा व उपवर-वधू परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन जि.प.अध्यक्षा योगीता भांडेकर यांच्या हस्ते झाले.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आ. देवराव भांडेकर, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे उपाध्यक्ष बबनराव फंड, विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा योगीता पिपरे, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, श्री संत जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भरडकर, विदर्भ तेली समाज नागपूरचे सचिव प्रा.विठ्ठलराव निकुरे,  प्रांतिक तेली महासभेचे उपाध्यक्ष बाबूराव कोहळे, प्रांतिक तेली समाज महासभा (दक्षिण) चे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, प्रांतिक तेली महासभा (दक्षिण) चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर,  किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्राग्रडे, तेली समाज महासभेचे संघटक रमेश भुरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  अतिथींच्या हस्ते उपवधू-वर परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी शहरातून संत जगनाडे महाराजांचा पालखी रथ व शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी आ.डॉ.देवराव होळी, माजी.आ.देवराव भांडेकर, रघुनाथ शेंडे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे,  प्रमोद पिपरे, प्रभाकर वासेकर व उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भरडकर, संचालन रोशनी राखडे व चेतन ठाकरे, तर आभार घनश्याम लाकडे यांनी मानले. मेळाव्याच्या आयोजनासाठी  भगवान ठाकरे, कवडू समर्थ, वेणूदास सहारे, घनश्याम लाकडे, जगदीश ठाकरे,  जीवनदास कोलते, गजानन ठाकरे, दिलीप सहारे, निलकंठ ठाकरे,  रवींद्र ठाकरे,  मधूकर भांडेकर, देवाजी सोनटक्के, सुरेश भांडेकर, गोपीनाथ चांदेवार, सुधाकर दुधबावरे, सुधाकर लाकडे,  प्रा.देवानंद कामडी, अॅड.रामदास कुनघाडकर, राजेश इटनकर, विठ्ठलराव कोठारे, राज करकाडे, रामदास कायरकर, सदाशिव आंबोरकर, दिलीप चलाख, मुक्तेश्वर काटवे, राजेंद्र भरडकर, अॅड.मंगेश भरडकर, अनिल बोदलकर,  माणिक कोलते, भूपेश कोलते, पुनाजी भजभुजे यांच्यासह तेली समाज संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधवांनी सहकार्यकेले. मेळाव्याला विदर्भातील सर्वच जिल्हयातील तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१५० वधू-वरांनी दिला परिचय
आजच्या मेळाव्यात १५० उपवर-वधूंनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवून आपला परिचय दिला. उपवर-वधूनी आपल्याला जोडीदार कसा पाहिजे, तो कसा असावा याबाबत मनमोकळपणाने आपले मत व्यक्त केले.

समाजासाठी योगदान देण्यास तत्पर: खा.अशोक नेते
जिल्ह्यात तेली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाच्या सहकार्यामुळे  माझ्या राजकीय प्रवासाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.  त्यामुळे तेली समाजाच्या विकासासाठी योगदान देण्यास मी नेहमीच तत्पर राहीन, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले. जिल्ह्यातील ओबीसीच्या समस्या व आरक्षणाचा प्रश्‌न लवकरच निकाली काढेन, अशी ग्वाही खा.नेते यांनी यावेळी दिली.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MS8ZA
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना