शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा

Saturday, 14th December 2019 06:38:44 AM

देसाईगज,ता.१४:राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने देसाईगंज येथील न्यायालयात आज राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत विविध प्रकारच्या ६३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

या राष्ट्रीय लोक अदालतीला देसाईगंज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश ए.आर.भडके, सामाजिक कार्यकर्त्या भारती उपाध्याय, अॅड .संजय गुरू, अॅड. वारजूरकर, अॅड. मंगेश शेंडे, अॅड..किशोर चोपकार, अॅड. अविनाश नाकाडे, अॅड. लाँगमाच॔ खोब्रागडे, अॅड. दत्ता पिलारे, अॅड.नेहा इलमुलवार, अॅड. तारिक सौदागर यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते.  या अदालतीत प्री लिटीगेशनच्या ५२  व नियमित फौजदारी खटला प्रकरणाच्या ११ अशा एकुण ६३ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला.

राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनासाठी देसाईगंज न्यायालयातील कर्मचारी लघुलेखक सुनील कनोजिया, वरिष्ठ लिपिक आर..बी..केळोदे, कनिष्ठ लिपिक विजय कावळे, मुकेश कावळे, सरोज साखरे, धीरज गेडाम, शिपाई विशाल नंदगीरवार आदींनी सहकार्य केले.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7SNDW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना