गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोलीत १५ डिसेंबरला तेली समाजाचा मेळावा

Thursday, 12th December 2019 11:15:58 PM

गडचिरोली, ता.१३: संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट प्रांतिक तैलिक महासंघ, विदर्भ तेली समाज महासंघ, संताजी सोशल क्लब व तेली समाज गडचिरोलीच्या वतीने १५ डिसेंबर रोजी गडचिरोली येथील आरमोरी मार्गावरील सुप्रभात मंगल कार्यालयात विदर्भस्तरीय उपवर- वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट प्रांतिक तेली समाज महासभेचे अध्यक्ष खा.रामदास तडस राहतील. आ.रामदास आंबटकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. सहउद्घाटक म्हणून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. भूषण कर्डीले, माजी आ.देवराव भांडेकर, विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे, महाराष्ट प्रांतिक तेली समाज महासभेचे उपाध्यक्ष बबनराव फंड, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्षा योगीता पिपरे, अहेरीच्या नगराध्यक्षा हर्षा ठाकरे, विदर्भ तेली समाजाचे सचिव प्रा.विठ्ठल निकुरे, महाराष्ट प्रांतिक तेली समाज महासभेचे उपाध्यक्ष बाबूराव कोहळे, महाराष्ट प्रांतिक तेली समाज महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, प्रांतिक तेली समाज महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, विशेष अतिथी म्हणून माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी उपस्थित राहतील. मेळाव्याप्रसंगी खा.अशोकनेते, आ.विजय वडेट्टीवार, आ.डॉ.देवराव होळी, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.कृष्णा गजबे उपस्थित राहणार असून, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
 ज्या उप वधू-वरांनी स्मरणिकेत नोंदणी केली नाही; त्यांनी मेळाव्याच्या दिवशी नोंदणी करावी, तसेच तेली समाज बांधवांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत जगनाडे महाराज तेली समाज जिल्हा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भरडकर यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
CE176
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना