बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी,अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित

Monday, 9th December 2019 07:27:07 AM

 

गडचिरोली,ता.९: राष्ट्रीय ओबीसी महासंघप्रणीत राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित्‍ करण्यात आली असून, विलास मस्के यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्याम लेंडे व महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष राजेश दरेकर यांच्या उपस्थितीत रविवारी(ता.८) गडचिरोलीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ओबीसी कर्मचारी, अधिकारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. या कार्यकारिणीचा कार्यकाळ ३ वर्षे असणार आहे.

कार्यकारिणीत अध्यक्ष-विलास  मस्के, सरचिटणीस-बंडू सातपुते , कोषाध्यक्ष-निलेश नैताम, सचिव-दुर्वास ठाकरे, सहसचिव-प्रकाश माकोडे, उपाध्यक्ष-सुधाकर दिवटे,  संजय घुबडे,  खुशाल चौधरी, नारायण ठाकरे, राजेश्वर कुनघाडकर,  लोमेश मशाखेत्री  व ज्येष्ठ सल्लागार  म्हणून राजेश  दरेकर, चंद्रकांत शिवणकर, दत्तराज नरड, उद्धव डांगे , पांडुरंग नागापुरे, सुरेश लडके  यांचा समावेश आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
QAI6P
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना