रविवार, 15 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

कला मानवी मनाला सतत तरुण ठेवते-कुलगुरु डॉ.सिद्धार्थ विनायक काणे

Monday, 2nd December 2019 12:53:12 PM

 

गडचिरोली,ता.२: विविध कला ह्या आपल्या मनासाठी टॉनिक आहेत. जसजसे वय वाढते; तसतसे आपले शरीर वृद्ध होते. परंतु मनाचे तसे होत नाही. मन हे शेवटपर्यंत तरुण राहू शकते. म्हणून विविध कलांच्या माध्यमातून आपण स्वत:ला उल्हासित करावे कारण विविध कला मानवी मनाला सतत तरुण ठेवतात, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांनी केले.

येथील गोंडवाना विद्यापीठात १७व्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ चे उद्‌घाटन कुलगुरु झॅ.काणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर ,तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, राजभवन निरीक्षक्‍ समितीचे अध्यक्ष डॉ.सुनील पाटील, वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉ.एम.बी.पाटील, सदस्य डॉ.विजया पाटील, डॉ.ज्ञानोबा मुंडे, डॉ.वाणी लातूरकर, राजू हिवसे, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ.प्रिया गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.कल्याणकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘इंद्रधनुष्य-२०१९’ च्या आयोजनाची जबाबदारी राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाकडे  सोपविली आहे. हा मंच जीवनाला कलाटणी देणारा असून, विद्यार्थ्यानी त्याचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ईश्वर मोहुर्ले, संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, तर आभार डॉ.प्रिया गेडाम यांनी मानले.

 २ ते ६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठांमधील आठशे स्पर्धक सहभागी झाले आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KPBO0
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना